पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता, पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला गेलेल्या पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.
Continues below advertisement