हॉटेल, रेस्टॉरंट्सला दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं, शाळा, कॉलेज उघडण्याची चिन्हं नाही
मुंबई : काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज टास्क फोर्सच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.