बुलडाणा : जेवण आणि मद्यप्राशन करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांचं कोविड सेंटरमधून पलायन
Continues below advertisement
बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने रोज 600 रुग्ण वाढत असताना दररोज कोविड सेंटर मधून रुग्ण पळून जाऊन जवळच्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जेवण व मध्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होतात. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटर मधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेले व राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्यावर मनसोक्त मध्यप्राशन करून परत कोविड सेंटरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक 55 वर्षीय रुग्ण अति मध्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला असल्याने काही समाजसेवकानी त्याला उचलून सामान्य रुग्णालयात भरती केले, या कोविड रुग्णाच्या हे समाजसेवक संपर्कात आले.
Continues below advertisement