Manikrao Kokate Update : माणिकराव कोकाटेंकडीत खातं बदललं जाणार? खांदेपालट होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची काल नवी दिल्लीमध्ये भेट झाली. या बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. कोकाटे यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचे मंत्रीपद काढून घेण्याऐवजी खांदेपालट करणे अधिक सोयीस्कर ठरेल, असा सूर या बैठकीत होता. महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोकाटे यांच्या खात्यात नेमका कोणता बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.