Poonam Pandey Alive : मी जिवंत आहे, माझ्या निधनाचं वृत्त खोटं : पूनम पांडे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPoonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) जिवंत आहे. तिच्या (Poonam Pandey Death News) निधनाची बातमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील (Cervical cancer) एक व्हिडीओ शेअर केला आहे. पूनम पांडेने शेअर केला व्हिडीओ (Poonam Pandey Shared Video) पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे - मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer) झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत".