Pooja Khedkar Case : लैगिंक छळाची तक्रार केल्यानं, माझ्याबाबत कारस्थान सुुरु : पूजा खेडकर
Pooja Khedkar : आपल्या कारनाम्यामुळं राज्यासह देशभरात चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडत आहे. खेडकरकडून (Pooja Khedkar) तिच्याकडे असलेलं दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) कोर्टाला सादर करण्यात आलं. पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा खेडकरच्या वकिलांनी केला आहे. त्याचबरोबर, जेव्हा आम्ही Pujaचं नाव बदलून Pooja असं केलं. त्या-त्या वेळी आम्ही गॅझेट नोटीफिकेशन केलं होतं, असा दावा देखील पूजा खेडकरच्या वकीलांनी कोर्टात केलेला आहे.
युक्तीवाद करताना खेडकरच्या वकिलांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) फायटर आहे. UPSC द्वारे प्रत्येक टप्प्यावर तिची उमेदवारी वैध करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. अपंग व्यक्ती म्हणून कायदा आणि सुधारणा करूनही पूजा खेडकरचे जीवन सोपे नव्हते. तिला प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईसमोर जावे लागले असेही तिच्या वकिलांनी यावेळी कोर्टात म्हटले आहे.
पूजा खेडकर फायटर आहे. दर वेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आम्ही 5 अटेम्प्ट चांगल्या हेतूने लिहिले होते. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटीत आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून? ती महिला आहे म्हणून? असे प्रश्न देखील पूजा खेडकरच्या वकिलांनी उपस्थित केले आहेत.
पूजा खेडकरवरील (Pooja Khedkar) अटकपूर्व जामिनावर सुनावणी आज पार पडत आहे. यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीची मागणी पूजा खेडकर (Pooja Khedkar) मार्फत करण्यात आलेली होती. पण, कोर्टाने ही मागणी फेटाळली होती. आज याप्रकरणी सुनावणी पार पडत आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडत आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar)च्या वतीनं अॅडव्होकेट बीना माधव यांनी बाजू मांडली आहे.
पूजा खेडकरच्या वकिलांचा युक्तिवाद
माहिती लपवणं आणि खोटी माहिती देणं, हा आरोप आमच्यावर लावला जाऊ शकतो..
मला ऐकले गेलेले नाही.
मला नोटीस मिळाली आणि दुसऱ्या दिवशी FIR नोंद झालं.
त्यांना माझी कोठडीत चौकशी का करायची आहे? माझ्या कस्टोडिअल चौआकशीची गरज काय?
माझ्यावर FIR झाला आणि मीडिया आमच्या मागे लागला.
मी मीडियात गेले नाही.
मी कोर्टात आले कारण आम्हाला कोर्टावर विश्वास आहे.
मी लैगिक छळाची तक्रार दिली म्हणून माझ्याविरोधात हे केलं जात आहे.