Pooja Khedkar News : पूजा खेडकर प्रकरणात डॉ. राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर

Continues below advertisement

 वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना देण्यात आलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं नाही, असा दावा पिंपरी पालिकेच्या वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळेंनी केला. मात्र आज वाबळे, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी विभागासह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू झालीये. एबीपी माझाने पूजा खेडकरांसह वायसीएम रुग्णालयाची पोलखोल करणारी कागदपत्रे समोर आणली अन पालिकेचे आयुक्त शेखर सिंहांना जाग आली. त्यांनी वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी केली. खरंच पूजा खेडकर डाव्या गुडघ्यात आधु आहे का? नसेल तर मग कोणत्या आधारावर आपण प्रमाणपत्र दिलं? याबाबत सविस्तर अहवाल बनवा, असे आदेश आयुक्तांनी दिलेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आम्ही दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, असा दावा डॉक्टर वाबळेंनी केला होता. मात्र आता त्याच वाबळेंसह डॉक्टरांची आणि मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आयुक्तांनी सुरू केलीये. आयुक्तांनी चौकशीअंती भाष्य करेन, असं म्हणत तूर्तास तरी अधिकच बोलणं टाळलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram