Pooja Khedkar Update News : पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती माझाच्या हाती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPooja Khedkar Update News : पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती माझाच्या हाती
IAS Pooja Khedkar : वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? IAS पूजा खेडकरांच्या बदलीवरुन स्थानिकांसह संभाजी ब्रिगेड आक्रमक
Washim News वाशिम : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. याच मुद्याला घेऊन आता वाशिम शहरातील स्थानिक नागरिकांसह संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चांगलीच आक्रमक झाली आहे.
पुणे पाठोपाठ वाशिममध्ये पूजा खेडकरांच्या बदलीला विरोध
प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पुणे पाठोपाठ आता वाशिममध्ये देखील विरोध होत आहे. वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? या आशयाचे पत्र राज्याचे मुख्यसचिव यांना लिहत स्थानिक वकील संदीप ताटके यांनी पूजा खेडकर यांची वाशिम मधून बदली करावी, अशी मागणी केली आहे. तर राज्य सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आंदोलनासोबतच या विरोधात रितसर याचिका दाखल करण्याची तयारीही ॲड. संदीप ताटके यांनी दाखवली आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्याला घेऊन या प्रकरणी आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.