Pooja khedkar : पूजा खेडकरांना IAS पद मिळवण्यासाठी 'त्या' प्रमाणपत्राचा उपयोग नाही, डीनचा दावा

Continues below advertisement

Pooja khedkar :  पूजा खेडकरांना IAS पद मिळवण्यासाठी 'त्या' प्रमाणपत्राचा उपयोग नाही, डीनचा दावा

IAS Pooja Khedkar : राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत.दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पालिका रूग्णालयाचे डीन डॉ. राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर आले आहेत. डॉ. राजेश वाबळे यांच्या सहीने पूजा खेडकला 7 टक्के अधुपणा असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं त्यामुळे डॉ. राजेश वाबळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्याचबरोबर डॉ. राजेश वाबळे यांनी पूजा खेडकरला दिलेल्या प्रमाणपत्राचा वापर दिव्यांग कोट्यातून परिक्षा देण्यासाठी केला असल्याचं मान्य केलं आहे. 

IAS पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं आहे का? यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे एबीपी माझाने समोर आणली. त्यानंतर पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह खडबडून जागे झालेत. आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. यात वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, ऑर्थोपेडिक प्रमुख, फिजिओथेरपीच्या प्रमुखांसह ज्यांचा ज्यांचा पूजा खेडकरांशी संबंध आला त्या सर्वांची ते चौकशी होत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram