Pooja Chavan Death Case | पूजा प्रकरणावर नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. पण राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मीडियावर खापर फोडत राठोड यांचा बचाव केला. पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या पाठराखणीने शिवसेना मंत्र्यांची अडचण झालीय कारण एकीकडे राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राठोड यांची पाठराखण केली.