Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण प्रकरणात 'गबरु'ची एन्ट्री, कोण आहे 'गबरुशेठ'?
हॅप्पी बर्थ डे गबरु. पूजा चव्हाणचे व्हायरल झालेले नवे फोटो चर्चेला हवा देणारे आहेत. कारण या फोटोत केकवर नाव लिहिलेला हा गबरु नक्की कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या फोटोत एक माणूस आपल्या हाताने पूजा चव्हाणला केक भरवतोय. इतकंच नाही तर त्या हातावर शिवसेनेचा धागा... म्हणजेच शिवबंधन बांधलंय. शिवाय काळा दोराही बांधला आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये पूजा स्वतः वनमंत्री असं नाव लिहिलेला केक कापतेय. आता हे दोन फोटो बघा. त्यातील लोकेशन सेम, लॉन सेम, बॅकग्राऊंड सेम आणि डोक्यावरची फरची टोपीही सेम. त्यामुळे या दोन फोटोंवरुनही प्रश्न विचारले जात आहेत. आता एक अशी ऑडिओ क्लिप सापडली आहे, जी थेट पूजाच्या लॅपटॉपमधली असल्याचं बोललं जात आहे. या क्लिपमधला मजकूर तर राठोड यांच्यावर प्रश्न निर्माण करत आहे.