Special Report Rajan Patil : मी नगरखेड सोडतो, सोलापुरात राजकीय भूकंप, पाटलांमध्ये कलगीतुरा

Continues below advertisement
सोलापूरच्या राजकारणात भाजपच्या मेगाभरतीमुळे मोठी उलथापालथ झाली असून मित्रपक्षांमध्येच वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असलेले माजी आमदार राजन पाटील यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. 'मी येईन का? माझा धाकटा नातूच येईल', अशा शब्दात उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यात राजन पाटील, बबनदादा शिंदे, दीपक साळुंखे आणि दिलीप माने यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप करत, याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola