Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचं आहे', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
राज्यात 'वोट जिहाद'च्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटला आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. 'वोट जिहाद मुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे,' असा थेट आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांच्या दाव्यानंतर, अमित साटम यांनी महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये 'वोट जिहाद' झाल्याचा आरोप करत या वादाला आणखी तोंड फोडले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप धार्मिक मुद्द्यांचा वापर करत असून, विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दुबार मतदारांच्या मुद्द्याला भाजपकडून धार्मिक रंग दिला जात असल्याचेही विरोधकांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement