Superfast News Updates : 8 च्या अपडेट्स : 8 AM : 7 NOV 2025 : ABP Majha
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आणि बजरंग सोनावणे यांनी चौकशीची मागणी केली आहे. 'मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आहेत आणि डॉनला कोण धमकी देत असतं का?', असा सवाल करत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी या कटामागे वाळू आणि जमीन माफिया असल्याचा संशय व्यक्त केला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरांगेंच्या सुरक्षेची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोलून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. खासदार बजरंग सोनावणे यांनी एसआयटी चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, तर आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement