MCA Elections: MCA निवडणुकीत राजकीय डावपेच, अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतरच एमसीए अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित होईल'. ही त्रैवार्षिक निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अनेक राजकीय नेते इच्छुक असून, त्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. शिंदे गटाचे आमदार किरण सामंत हे सुद्धा MCA प्रशासनात येण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे, मात्र ते सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू उदय सामंत यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement