Amravati Politics: दिवाळीच्या तोंडावर अमरावतीत राजकीय फटाके, राणा-ठाकूर पुन्हा आमनेसामने
Continues below advertisement
अमरावतीत (Amravati) दिवाळीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यात दिवाळी हॅम्पर आणि कीट वाटपावरून शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'ननंद बाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत,' अशा शब्दात नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेमुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली असून, दोन्ही नेत्यांमधील जुना संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकमेकींवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांमधील वाद आता दिवाळीच्या निमित्ताने आणखी तीव्र झाला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement