Shugar Factory Name : जतच्या साखर कारखान्याचं नाव बदललं, पडळकर-पाटलांमध्ये नवा वाद
Continues below advertisement
सांगलीच्या जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नामकरणावरून नवीन वाद पेटला आहे. या प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. 'आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,' असा थेट इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. काही अज्ञातांनी कारखान्याच्या कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असा नवीन फलक लावल्याने हा वाद उफाळला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या घटनेचा निषेध करत याला राजकीय स्टंटबाजी म्हटले आहे. दुसरीकडे, पडळकर यांनी नाव बदलण्याचे समर्थन केले आहे. हा कारखाना पूर्वी राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाने ओळखला जात होता, पण नंतर आर्थिक अडचणींमुळे तो लिलावात निघाला. २०१२ मध्ये राजारामबापू कारखान्याने तो विकत घेतला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement