Social Media Alert: 'सोशल मीडियावर 'व्हेकेशन' अपडेट्स? पोलिसांचा इशारा, घरफोडीला निमंत्रण

Continues below advertisement
दिवाळीच्या काळात सोशल मीडियावर (Social Media) सुट्ट्यांचे अपडेट्स (Vacation Updates) टाकणे महागात पडू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे, कारण चोरटे आता सोशल मीडिया पोस्टवरून घरे लक्ष्य करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, प्रवासाचा गवगवा करू नये आणि जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. दुसरीकडे, एअर इंडियाच्या विमानात एका महिलेने मराठीत बोलण्यावरून युट्युबर माही खानला (Mahi Khan) धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'मुंबईत राहायचं असेल तर मराठीतच बोला' असे म्हणत महिलेने वाद घातल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola