Ravikant Tupkar : कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, आंदोलनावर ठाम : रविकांत तुपकर

Continues below advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी नोटीस दिलीये.. मुंबईच्या अरबी समुद्रात होणारं जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा  कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी दिलाय..  परंतु अशा नोटीशींना मी घाबरत नाही, काही झालं तरी जलसमाधी आंदोलन करणारचं असा ठाम निर्धार रविकांत तुपकरांनी केला आहे. सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोयाबीनचा भाव प्रति क्वि.8,500 रु. व कापसाचा भाव प्रति क्वि.12,500 रु. स्थिर रहावा यासाठी सरकारने धोरण आखावे,  यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram