
Srinagar : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच, घरात घुसून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या
Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केलाय. अनचार सौरा परिसरात दहशतवाद्यांनी घरात घुसून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केलीय. यात पोलिसाची मुलगी गंभीर जखमी झालीय. अनचार सौरा परिसरात पोलीस कर्मचारी सैैफुल्ला कादरी यांचे घर आहे. मंगळवारी सकाळी ते मुलीला घेऊन शाळेत निघाले होते. त्याचवेळी दहशतवादी घरात घुसले आणि अंदाधूंद गोळीबार करून पसार झाले.
Continues below advertisement