Police Advisory: सोशल मीडियावर 'चमकणं' पडेल महागात? पोलिसांचा इशारा Special Report

Continues below advertisement
दिवाळीच्या काळात वाढत्या घरफोड्या आणि सोशल मीडियावरील अपडेट्सच्या संबंधावर पोलिसांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताना सावध राहा,' असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. अनेक नागरिक सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्यावर आपले फोटो आणि लोकेशन सोशल मीडियावर शेअर करतात, याचाच फायदा घेऊन चोरटे रिकामी घरे लक्ष्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची माहिती ऑनलाइन शेअर केल्याने गुन्हेगारांना आयतेच निमंत्रण मिळते. आजचे चोर केवळ रस्त्यावरचे नसून 'इंटरनेट-सॅव्ही' झाले आहेत आणि ते इंस्टाग्राम व फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर सतत नजर ठेवून असतात. त्यामुळे, सोशल मीडियावर चमकण्याच्या नादात आयुष्यभराची जमापुंजी गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola