Police CCTV Cameras : पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही प्रकल्प म्हणजे फसवणूक,453 कॅमेरे बंद: उच्च न्यायालय

Continues below advertisement

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची फसवणूक असल्याचं म्हणत उच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर ताशेरे ओढले आहेत. राज्यामध्ये 1 हजार 89 पोलिस ठाणे आहेत. आतापर्यंत केवळ 547 पोलीस ठाण्यांमध्ये 6 हजार 92 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातील 5 हजार 639 कॅमेरे कार्यरत होते. तर, 453 कॅमेरे बंद असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे काल उच्च न्यायालयात देण्यात आली. या स्थितीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आता आम्ही प्रशासनही चालवायचं का?, असा संतप्त सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसंच हे सीसीटीव्ही बसवण्याच्या खर्चावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. आता 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram