Police Bharti Maharashtra : 17 हजार जागांसाठी महाराष्ट्रात पोलीस भरती; 17 लाख अर्ज दाखल

Continues below advertisement

Police Bharti Maharashtra : 17 हजार जागांसाठी महाराष्ट्रात पोलीस भरती; 17 लाख अर्ज दाखल मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मागील सहा महिन्यांपासून तरुण-तरुणींकडून पोलीस भरतीची तयारी सुरु, मात्र सरकारने ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया न घेता ती नंतर घ्यायला हवी होती, तरूणांनी व्यक्त केलं मत.  राज्यात आज पासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे... मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे मागील सहा महिन्यापासून तरुण-तरुणी भरतीची तयारी करत आहेत.. मात्र राज्य सरकारने ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया न घेता ती नंतर घ्यायला हवी होती अशी भावना या तरुण-तरुणीनी व्यक्त केलेली आहे... अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीण 207 असे एकूण 281 जागांसाठी ही भरती होणार असून शहरातील 74 जागेसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत.. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनात विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram