Paper Leak : पेपरफुटी प्रकरणात बीडमधील एका शिक्षकाला अटक, पाहा काय म्हणाले आयुक्त अमिताभ गुप्ता
Continues below advertisement
पेपरफुटी प्रकरणात बीडमधील एका शिक्षकाला अटक करण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या गट 'क' विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरून प्रश्नपत्रिका फोडण्यात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर आलीय.
Continues below advertisement