PM Narendra Modi : नव्या संसदेच्या उद्घाटनप्रसंगी 35 मिनिटांचं भाषण, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Continues below advertisement

PM Narendra Modi : नव्या संसदेच्या उद्घाटनप्रसंगी 35 मिनिटांचं भाषण, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

PM Modi Speech : "देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस. ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. देशाला आज नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल भाषण केलं. "नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन येतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसंच संविधानाचा आवाज आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आजचा दिवस देशासाठी शुभ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारतातील जनतेने संसदेची ही नवी इमारत आपल्या लोकशाहीला भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना झाली, भारतीय लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram