PM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज
PM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज
काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जिवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केला. नाशिक येथे आयोजित महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी पाहतोय नाशकात जनसमूह, महाराष्ट्र बोलतोय भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे. डबल इंजिनमध्ये डबल विकास महाराष्ट्र विकास करतोय. देश नवे रेकोर्ड बनवतोय. देशात गरिबांची चिंता करणारं हे सरकार आहे. गरीब पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, लोकांच्या पदरी काही पडलं नाही. 10 वर्षात 25 कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले आहेत. हे शक्य झालं कारण मोदी की नियत सही है. मोदी सेवक बनून काम करतो. हे शक्य झालं कारण गरीबी विरोधातली लढाई सर्वांनी लढली. 50 लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनांचे गॅस कनेक्शन आहेत. नल-जल सुविधा मिळाली आहे. 7 कोटी लोकांना अन्नधान्य मिळतंय. गरिबांसाठी चांगले काम होत आहे, ही कामे पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकार बनवणं गरजेचं आहे. डबल इंजिनमध्ये विकास डबल होतो. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन होणार तेव्हा ही मदत 15 हजार रुपयांची केली जाणार आहे.