PM Narendra Modi Inaugurates Shivadi Nhava Sheva Sea Link : मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन

Continues below advertisement

PM Narendra Modi Inaugurates Shivadi Nhava Sheva Sea Link : मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन
नाशिक: राम मंदिर (Ram Mandir)  बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray)  स्वप्न पूर्ण केले आहे. राम मंदिराअगोदर हा दौरा शुभ संकेत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  म्हणाले.  तसेच पंतप्रधान मोदी (PM Modi) लक्षद्वीपमध्ये गेले  आणि मालदीवमध्ये ( Lakshadweep Maldives controversy ) भूकंप आला, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.   
एकनाथ शिंदे म्हणाले.  जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून  मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो.   राष्ट्रीय युवक महोत्सवाच आयोजन करण्याची संधी दिली हे आमचे सौभग्य आहे.  रामाच्या पवित्र भूमीत मोदी आले ती गौरवाची बाब आहे. अयोध्याच्य राममंदिर उभारणीचे हे शुभ संकेत आहेत . बाळासाहेब ठाकरेंचे  यांचं हे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे.   
मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला : मुख्यमंत्री 
मोदी आहे तर मुमकीन आहे.  मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणते तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढते. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे.  मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच आहे. भारत जगातील सर्वाधिक युवकांचा देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram