PM Narendra Modi बंगळुरू-मैसूर एक्स्प्रेसवेचं उद्घाटन करणार, पर्यटनाला चालना मिळणार : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरू-मैसूर एक्स्प्रेसवेचं उद्घाटन करणार आहेत.. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.. कारण केवळ मैसूर नाही तर ऊटी आणि कूर्गला जातानाही या एक्स्प्रेसवेमुळे दीड ते दोन तासांची बचत होणार आहे. बंगळुरू ते मैसूर हा कर्नाटकातला अतिशय गजबजलेला महामार्ग आहे.. याचं कारण म्हणजे इथं पर्यटकांची तसंच मालवाहू अवजड वाहनांची संख्या प्रचंड असते.. नितीन गडकरींच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हा एक्स्प्रेसवे अवघ्या साडे चार वर्षांत पूर्ण केला आहे.