PM Narendra Modi Full Speech Solapur : कंठ दाटला, आवंढा गिळला; सोलापुरात पंतप्रधान मोदी भावूक

PM Narendra Modi Full Speech Solapur : कंठ दाटला, आवंढा गिळला; सोलापुरात पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Visit Solapur Maharashtra: सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात (Solapur News) कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केलं. असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावनिक झाले. 

आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृह प्रवेश होईल. माझा आनंद वाढणार की नाही? सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही? आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींचा कंठ दाठला आणि मोदी भावनाविवश झाले. तसेच, आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असं मोदी म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola