PM Modi Convoy Shivaji Park : ठाकरे-फडणवीस-शिंदे मंचावर, Narendra Modi यांचा ताफा शिवाजीपार्कवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे शिवतिर्थ बंगल्यावर एकत्र दिसून आले. शिवाजी पार्क मैदानासमोर असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावरील गॅलरीत तिन्ही नेते एकत्र संवाद साधताना पाहायला मिळाले.

राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. राज ठाकरेंच्या गॅलरीत तिन्ही नेते दिसले, तिघेही हास्यविनोद करताना पाहायला मिळाले. 


शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडीत भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि आपचे खासदार संजय सिंह हेदेखील उपस्थित होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी शिवाजी पार्क येथे सभा घेत आहेत. मोदी सभा घेत असल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केलीय. या सभेसाठी भाजपा व मनसे पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्ककडे निघाल्याचे दिसून येते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola