PM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:ख

Continues below advertisement

PM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:ख

भारतीय उद्योगविश्वातला आधारवड रतन टाटा (Ratan) यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योगविश्वार मोठी शोककळा पसरली आहे. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांच्या उद्योगविश्वातील तत्त्वे ही तरुण उद्योजकांसाठी आदर्श आहेत आणि ती कायम राहतील अशा भावना युवा उद्योजक व्यक्त करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, श्री रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती! 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram