Pm Modi vs Sharad Pawar : आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींच्या ऑफरवर पवारांचं उत्तर
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्घव ठाकरेंची शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एनडीएमध्ये सहभागी व्हावं अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली. बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार प्रचंड हताश झाले असून त्यांनी त्या नैराश्यातूनच काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील असं विधान केलं असं नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह या आणि तुमची सगळी स्वप्न साकार करा अशी खुली ऑफर देऊन टाकली. मोदींच्या या खुल्या ऑफरवरून राज्यात मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. मोदींची ऑफर नाकारात शरद पवारांनी मोदींवर टीका केलीय..