PM Modi Sindhudurg Daura : Indian Navy Day निमित्त मोदी सिंधुदुर्गमध्ये, कसा असणार कार्यक्रम?
PM Modi Sindhudurg Daura : Indian Navy Day निमित्त मोदी सिंधुदुर्गमध्ये, कसा असणार कार्यक्रम?
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्ताने तारकर्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदाजे 3.40 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते अनावरण करतील. त्याशिवाय पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे.