PM Modi Nashik Sabha Speech : नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, मोदींचा मोठा दावा
abp majha web team
Updated at:
15 May 2024 05:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.