PM Modi vs Pawar - Thackeray : नरेंद्र मोदींची ऑफर; शरद पवार, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्घव ठाकरेंची शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एनडीएमध्ये सहभागी व्हावं अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली. बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार प्रचंड हताश झाले असून त्यांनी त्या नैराश्यातूनच काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील असं विधान केलं असं नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह या आणि तुमची सगळी स्वप्न साकार करा अशी खुली ऑफर देऊन टाकली. तर मोदींच्या ऑफरवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. मोदींमुळे लोकशाही धोक्यात आलीय. त्यांच्यासोबत जाणार नाही, असं शरद पवार म्हणालेत. तर मोदींनी आज शरद पवारांना डोळा मारला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola