PM Modi Oath Ceremony : Narendra Modi यांच्या शपथविधी दरम्यान दिल्लीत विमानाच्या घिरट्या बंद!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Oath : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड केली आहे. यामुळे नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. तर, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या 9 जूनला पार पडणार आहे.
संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता 8 नाही तर 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 8 जून रोजी शपथविधीची तारीख ठरली होती. पण, त्यानंतर आता 9 जून 2024 हा दिवस शपथविधीचा ठरविण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 जून ही तारीख किती शुभ आहे? या दिवशी ग्रहांच्या हालचाली नेमक्या कशा आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 240 जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्ष तेलगू देशम पक्षाने (टीडीपी) 16, जेडीयू 12, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 5 जागा जिंकल्या आहेत.
9 जून 2024 चा पंचांग (9 June 2024 Panchang)
दिवस - रविवार
तिथी - तृतीया (दु. 3:46 मिनिटांपर्यंत)
नक्षत्र - पुनर्वसु (रात्री 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत)
योग - वृ्द्धी योग (संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत)
राहुकाळ - संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांपासून ते 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11 वाजून 52 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत
दिशा शूल -पश्चिम
9 जून रोजी रविवार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दुपारी 3:46 पर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थीची तिथी सुरू होईल.चतुर्थीच्या तिथीला शपथविधी पार पडणार आहे. या दिवशी वृद्धी योग हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी पुनवर्सू नक्षत्र रात्री 8.21 वाजता संपेल. त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्रात शपथ घेतल्यास अधिक शुभ परिणाम मिळू शकतात.