PM Modi Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो तीन आणि इतर विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. या विकासकामांमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांना गती मिळेल. पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनमध्ये वास्तव्यास असतील. दुसऱ्या दिवशी ते ग्लोबल फिनटेक फेस्टिवल २०२५ मध्ये उपस्थिती लावतील. ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर हे देखील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये उपस्थित राहणार आहेत. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ आणि मुंबई मेट्रो तीनचे उद्घाटन हे या दौऱ्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या दौऱ्याला मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अभिषेक मुठाळा यांनी या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement