PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईत

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर...सकाळी वाशिममधील नंगारा भवनाचं लोकार्पण, तर संध्याकाळी मुंबईतील मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत... या दौऱ्यात 'पीएम-किसान सन्मान निधी'चा वीस हजार कोटी रुपयांचा 18 वा हप्ता देखील जारी करण्यात येणारय.. वाशिममधून मोदी, कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित, २३ हजार ३०० कोटींच्या  उपक्रमांचा शुभारंभ करतील.. तर ठाण्यात ३२ हजार ८०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत.. याशिवाय बीकेसी ते आरे, दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ट्रेनला संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.. 

PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आहे. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे माझे देखील नुकसान झाले असं मोदींनी म्हटलं आहे, तर यावेळी बोलताना त्यांनी पुण्याचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विरोधकांच्या कामाच्या गतीमुळे महाराष्ट्र राज्यासह देशाचं मोठं नुकसान झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज डिस्ट्रिक्ट रोड ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. स्वारगेट ते कात्रज सेक्शनचं उद्घाटन झालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांची पायाभरणी झाली. आपण वेगाने पुढे जात आहोत. आज विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांनाही भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट एअर कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी एअरपोर्टला अपडेट करण्याचं काम केलं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा केली आहे.त्यामुळे देश विदेशातून विठ्ठलांच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल. विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी लोकं थेट सोलापूरला येतील. व्यापार व्यवसाय आणि पर्यटनालाही गती मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला या विकास कामासाठी अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram