PM Modi Mumbai : मोदींचा मुंबई दौरा, मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान संबोधित करणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते इंडिया मॅरिटाइम वीक २०२५ (India Maritime Week 2025) मध्ये सहभागी होऊन ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरममध्ये (Global Maritime CEO Forum) जगातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओंना संबोधित करणार आहेत. 'मेरीटाइम अमृत काल व्हिजन २०४७ च्या अनुषंगाने, भारत जगातील आघाडीची सागरी शक्ती म्हणून उदयास येईल,' असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमात बंदरांच्या विकासावर आधारित विकास, शिपिंग आणि जहाजबांधणी, अखंड लॉजिस्टिक्स आणि सागरी कौशल्य विकास या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित केले आहे. २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या कार्यक्रमात ८५ हून अधिक देश सहभागी झाले असून, एक लाखांहून अधिक प्रतिनिधी आणि ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement