CGI Dearness Allowance : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. जवळपास ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर जवळपास १३ हजार कोटींचा बोजा पडणार आहे. याआधी ऑक्टोबर २०२३मध्ये देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता. तेव्हा तो ४६ टक्क्यांवर गेला होता. आजच्या वाढीमुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवर गेला आहे.
Continues below advertisement