PM Modi Celebrates Diwali with Jawans : पंतप्रधान मोदींचा नौसैनिकांशी संवाद, मिठाई भरवली

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची दिवाळी गोव्यामध्ये आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली आहे. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. 'केवळ नावानेच विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली आहे', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही भारतीय लष्करी क्षमतेचे प्रतिबिंब असल्याचेही ते म्हणाले. जवानांनी यावेळी देशभक्तीपर गाणी सादर केली, ज्यामध्ये त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला. मोदींनी जवानांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आयएनएस विक्रांत हे २१व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रमाचे, प्रतिभेचे आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी काढले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola