India-UK Partnership | पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांची आज बैठक, 2035 च्या अनुषंगाने चर्चा होणार

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांच्यासोबत ब्रिटनचे पंतप्रधान कीरस स्टारमरही मुंबईत आहेत. आज सकाळी दहा वाजता राजभवनमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत 'Vision 2035' च्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. बैठकीनंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला दोन्ही देशांचे नेते आणि अधिकारी उपस्थित असतील. तसेच, जिओ वर्ल्ड सेंटरमधील CEO Forum मध्ये दोन्ही पंतप्रधान सहभागी होतील. यानंतर सहाव्या Global Fintech Festival मध्ये मोदी आणि Starmer सहभागी होऊन भाषण देतील. ब्रिटनचे पंतप्रधान कीरस स्टारमर यांनी काल यशराज फिल्मच्या स्टुडिओला भेट दिली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola