#Maratha उद्या पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट, अजित पवार, अशोक चव्हाणही उद्या दिल्लीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2021 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी वाजता भेटणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.