Piyush Goyal On Ratan Tata :पीयूष गोयलयांनी रतन टाटांच्या दानशुरतेचे किस्से सांगितले

Continues below advertisement

Piyush Goyal On Ratan Tata :पीयूष गोयलयांनी रतन टाटांच्या दानशुरतेचे किस्से सांगितले टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 28 डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धूरा देण्यात आली.   जगभरात टाटा समूहाची झेप रतन टाटा हे पुस्तकप्रेमी होते. त्यांना यशोगाथा वाचनाची आवड होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, निवृत्तीनंतर आता ते आपल्या छंदासाठी वेळ देत आहेत. 1991 ते 2012 पर्यंत गटाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. रतन हे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख होते. रतन टाटा यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेला. एअर इंडियाचा त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. परदेशी कंपनी फोर्डने लँड्रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती.  टाटा कंपनी भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, तिच्या 30 कंपन्या जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 10 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये व्यवसाय करतात. सध्या एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे प्रमुख गुंतवणूकदार आणि टाटा कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. टाटा सन्सचे 66 टक्के भाग भांडवल त्याच्या धर्मादाय ट्रस्टकडे आहेत. जे 2023-24 मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण उत्पन्न 13.86 लाख कोटी रुपये होते. यातून 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यांची उत्पादने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनात समाविष्ट आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram