Pimpri Water Cut Off : येत्या गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Oct 2023 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा बंद करण्यात येणारेय. दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मावळमधील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. निगडीच्या सेक्टर २३ येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती, पाणी वितरण व्यवस्थेतील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.