Pimpri Crime : गर्भपातावेळी प्रेयसीचा जीव गेला; नदीच्या प्रवाहात मृतदेहाची विल्हेवाट

Continues below advertisement

Pimpri Crime : गर्भपातावेळी प्रेयसीचा जीव गेला; नदीच्या प्रवाहात मृतदेहाची विल्हेवाट गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना ही नदीत जीवंत फेकलं. पुण्यात धक्कादायक घटना समोर.  विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला अन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही संतापजनक घटना 9 जुलैला घडली. 6 जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram