Pimpari : पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत शिवसेनेला संपवण्याचं काम - आढळराव पाटील : ABP Majha

पुणे : जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून शिवसेना (Shiv Sena) संपवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केला आहे. 

पुण्यातील बैलगाडा शर्यत ऐनवेळी स्थगित केल्यापासून शिवाजी आढळराव-पाटील पुण्याच्या कारभाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. "महाविकास आघाडी आहे तर असू द्या, ती फक्त तुमच्या फायद्याची आहे" असं म्हणत आढळरावांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, "गेली दोन वर्षे आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये आहोत. पण पुणे जिल्ह्यात आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वार केले जात आहेत. या माध्यमातून पुण्यातील शिवसेना संपवण्याचं काम केलं जात आहे. पण आम्ही नेटाने तग धरून लढा देत राहू. महाविकास आघाडी म्हणून आमचं एकच म्हणणं आहे. पुण्यातील शिवसैनिकांना संपवू नका. त्यांना शिवसैनिक म्हणून जगू द्या, अशी खंत आढळराव-पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola