Phaltan Doctor case : डॉक्टर मृत्यू प्रकरण, सुषमा अंधारे आक्रमक, SIT चौकशीची मागणी
Continues below advertisement
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून, त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी तर सोडा, पण सरकारने याच्यात एसआयटी सुद्धा केली नाही,' असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. राज्य सरकारने केवळ देखरेखीसाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली असून, ही विशेष तपास पथक (SIT) नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. पीडित डॉक्टरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चार पानी पत्रालाच सुसाईड नोट मानून, त्यात उल्लेख असलेल्या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी कस्टोडियल डेथ आणि अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणांप्रमाणेच, या प्रकरणातही राजकीय प्रभावापासून मुक्त चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement