Phaltan Doctor Case : 'माझा काहीही संबंध नाही', रणजितसिंह निंबाळकरांचा दावा; पण आरोपांचं सावट कायम
Continues below advertisement
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे सावट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यावर आहे. 'आपला या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही', असा दावा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. मात्र, विरोधकांनी थेट नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रविवारी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक मंत्री उपस्थित राहणार असून, याच मंचावर रणजितसिंह नाईक-निंबाळकर देखील असणार आहेत. त्यामुळे, पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement