Phaltan Case: फलटण डॉक्टर प्रकरणी हत्या की जीवन संपवलं? सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप

Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले असून, शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये... नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर. येथे क्लीन चीट वाटून मिळतील,' असा थेट टोला अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला आहे. पत्रकार परिषद घेत अंधारेंनी मृत तरुणीच्या पत्रातील आणि हातावरील सुसाईड नोटमधील 'निरीक्षक' शब्दाच्या वेलांटीत फरक असल्याचे सांगत हस्ताक्षरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत्यूनंतर तरुणीच्या व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसे झाले, असा सवालही त्यांनी केला. अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर पीडितेचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्याकडील शस्त्रास्त्रांचा व्हिडिओ दाखवत त्यांच्यावरही हल्लाबोल केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola